जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरच शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत

जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या वर्षासाठी तसेच २०१९-२० चे त्रुटीयुक्त अर्ज पुन्हा सादर करणे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मागे पाठविलेले अर्ज महाडीबीटीप्रणालीवर सादर करण्यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी ही संगणक प्रणाली ३ डिसेंबरपासून कार्यान्वित झाली असल्याचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले.