विवाहितेवर दिराकडून वारंवार शारिरीक अत्याचार ; गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव ग्रामीण भागातील एका गावात ३३ वर्षीय विवाहितेवर तिच्या दिरानेच बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव ग्रामीण भागातील एका गावात ३३ वर्षीय विवाहिता तिच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान संशयित विक्की गणेश बडगुजर रा. कोळीवाडा’ बोरनार ता. जळगाव याने विवाहितेवर फोनवर बोलणे झाल्याची रेकॉर्डिग तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले.

याप्रकरणी विवाहितेने रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून संशयित विकी बडगुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.