जळगावातील सपकाळे खुनातील पाचव्या संशयिताला १६ दिवसांनी अटक

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खुनातील पाचवा संशयित १६ दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला.

आकाश मुरलीधर सपकाळे (वय २३, रा. कांचननगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यापूर्वी गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय सपकाळे, रूपेश संजय सपकाळे, महेश राजू निंबाळकर या चौघांना अटक करण्यात आली होती.

तर आकाश हा शुक्रवारी सायंकाळी पाळधी शिवारात पायी फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

यानंतर विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर व रतन गिते यांच्या पथकाने त्याला अटक केली. पुढील तपासासाठी शहर पोलिसांकडे दिले.