जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे.
जळगाव स्टेशन प्रबंधकांना निवेदन देतांना यावेळी आमदार राजुमामा भोळे, जिल्हा अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नगरसेवक महेश चौधरी आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, सरचिटणीस योगेश पाटील, संजय शिंपी, कोषाध्यक्ष भानुदास पवार, नगरसेवक नवनाथ दांरकुडे, दिनेश पूरोहीत, विजय बारी, चंदु महाले, रमेश जोगी, शांताराम गावडे, अनुसूचित जाती अध्यक्ष लता बाविस्कर, महीला आघाडी सदस्य वैशाली सोलंकी, कल्पेश ठिवरे, गुंजन पाटील, चंद्रकांत तायडे, बाळकृष्ण कखपुरे, राजेंद्र मराठे, सूनिल माळी, नितीन पाटील आदी उपस्थित होते.