जळगावात जुन्या वादातून हाणामारी; गुन्हा दाखल

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> पिंप्राळा हुडको येथे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुन्यावादातून मोठ्या भावाचे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांना जबर मारहाण केल्याप्रकरणी रामानंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पिंप्राळा हुडको येथे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भाऊ शेख सलमान शेख शबीर (वय-२८) याचे शेख शाहरुख शेख नुरा (रा. मास्टर कॉलनी) आणि शेख रईस शेख नुरा (रा. गेंदालाल मिल) यांच्यात मागील वादातून भांडण सुरु होते.

त्यावेळी तेथून रिक्षाचालक असलेला शेख इरफान शेख शाबीर (वय-२५) हा जात होता. मोठ्या भावाचे भांडण सुरु असल्यामुळे तो मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत होता. परंतू शेख रईस आणि शेख शाहरूख याने संतापाच्या भरात शेख इरफान यालाच बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

तर भांडण सोडवीत असतांना इरफानचा सावत्र भाऊ शेख अलिम शेख शाबीर याच्या हाताला दुखापत झाली. तर इरफानच्या डोक्याला दगड लागल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *