जळगावात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव

जळगाव : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून, शहरातील लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आज (दि.३ मे) रोजी एमआयडीसी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरात खाद्य पदार्थ विक्री करतांना सुखनंदन कपुरचंद अहेरवाल (वय-२६ रा.सिंधी कॉलनी), मनोहर गोपीचंद कुकरेजा (वय-५२ रा. सिंधी कॉलनी) हे दोघे आढळून आले तर बाबा कुलर दुकानावर दुकानदार विजय सदानंद लुल्ला (वय-६१ रा. सिंधी कॉलनी) याने दुकानावर पाच पेक्षा अधिक जण एकत्र आल्याप्रकरणी, तर शेख शेरू शेख करीत (वय-३६ रा.खदान रोड, बिलाल चौक), शेख आरीफ शेख करीम (वय-३५ रा. मेहरूण रोड, मच्छी बाजार जवळ, तांबापूरा), चिराग शेख रोशन (वय-३० रा. नवा तांबापूरा), सलमान शकील पटेल (वय-२३ रा. व्यास मेडीकल, मेहरूण रोड) या चौघांनी तोंडाला मास्क न लावणे, असे विविध प्रकाराच्या गुन्ह्यातील सात जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड १९ च्यासंदर्भात लागू केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *