शेंदूर्णी येथील २ संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. शेंदुर्णी शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ३

Jalgaon जळगाव

शेंदूर्णी, ता.जामनेर, दि .२० ( गजानन सरोदे ) : – शेंदुर्णी येथील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीचा स्वॅब तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता शेंदुर्णी शहरातील बाधीतांची संख्या ३ झाली आहे. बाधीतांमधे दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे .आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती पती पत्नी असून वयस्कर असल्याने त्यांना इतरही व्याधी आहेत गेल्या ७/८ दिवसापासून त्यांच्यावर औरंगाबाद येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गेल्या पाच दिवसापासून त्यांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्याने स्वॅब घेण्यात आले होते. कोरोना संशयित म्हणून त्याचा स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आला होता त्यांचा अहवाल आज मिळाला असून पॉझिटिव्ह आला आहे परिवारातील व इतर संपर्कातील व्यक्तींच्या नावांचा शोध घेतला जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती राहत असलेला परिसर शेंदूर्णी नगरपंचायत कडून सॅनिटाइज करून प्रतिबंधीत करण्यात आला आहे.नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी व विना मास्क ,विना कारण घराबाहेर पडू नये नगरपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे ,प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष सौ.विजया खलसे,उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल मुख्याधिकारी साजिद पिंजारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम ,सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी शेंदूर्णीकर जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *