दारू आणायला गाडी दिली नाही म्हणून जिगरी दोस्ताकडून दोस्ताचा खून ; जळगावातील धक्कादायक घटना!

Jalgaon क्राईम जळगाव

रिड जळगाव टीम ::> शहरात दि.5 ऑक्टोबर रात्री 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या दूध फ्रेडरेशन जवळ चिकनच्या दुकानाजवळ 45 वर्षीय इसमाचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 31 ) रा.इंद्रप्रस्त नगर जळगाव आणि अरुण हरी पवार (वय 45 )रा. केसी पार्क ,कानळदा रोड ,जकात नाक्याच्या मागे शिवाजीनगर , जळगाव हे दोघे मित्र आहेत.

काल रात्री चिकनच्या गाडी जवळ दारू आणायची आहे, मला मोटरसायकल दे असे संशयित आरोपी हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल याने अरुण हरी पवार याला सांगितले. मात्र मोटरसायकल द्यायला अरुण पवारने हरिश्‍चंद्रला नकार दिला. त्यामुळे त्याचा राग येऊन अरुण पवार याला लाता बूक्यांनी मारहाण करुन डोक्यात हरिश्चंद्रने फरशी मारली. त्यामध्ये तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला उपचारासाठी देवकर कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने तात्काळ हरिश्चंद्चा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. अरुण हरी पवार यांच्या पत्नी फिर्यादी  रत्नाबाई अरुण पवार वय 34 यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम करीत आहे. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र उर्फ काल्या अटवाल याच्यावर यापूर्वी पण गुन्हे दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *