जळगाव प्रतिनिधी ::> खोटेनगरात आजीकडे राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने तीन ओळींची चिठ्ठी लिहिली आहे. स्वत:हून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.
या मुलीवर गतवर्षी पिंप्राळा हुडको येथील एका दोनवर्षीय बालिकेचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सुहाना शेख मुस्ताक (वय १५, रा. राज मालतीनगर, दांडेकरनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. ती गेल्या सहा महिन्यांपासून खोटेनगरात आजीकडे राहत होती.
दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी सुहाना ही घरातील वरच्या मजल्यावर एका खोलीत झोपली होती.
सायंकाळी सात वाजेपर्यंत ती खाली न आल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी चौकशी केली असता ही घटना उघड झाली.