प्लास्टिकच्या पिशव्यांचा कंपनीत साठा आढळल्यामुळे दंड

Jalgaon Jalgaon MIDC जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी एमआयडीसीतील मातोश्री प्लास्टिक या कंपनीत धाड टाकली. त्यात सुमारे २५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळूनआला. कंपनीला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर जप्त माल विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात आला.

शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली असताना शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या व्यवसायात मोठा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेच्यावतीने कारवाईचे सत्र राबवण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास सहायक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोग्य अधीक्षक शरद बडगुजर, संजय अत्तरदे, के. के. बडगुजर, एन. ई. लोखंडे, भगिरथ सरसीया, दिलीप बाविस्कर, किरण कदम, मोहन जाधव यांच्या पथकाने एमआयडीसीतील मातोश्री प्लास्टिक या कंपनीत अचानक तपासणी केली. यात छपाई सुरू असल्याचे निदर्शनात आल्याने महापालिकेच्या पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.