जळगावातील ‘राष्ट्रवादी’ च्या कार्यकर्त्यांनी दिले खडसेंना प्रवेशाचे आमंत्रण !

Jalgaon Politicalकट्टा Social कट्टा कट्टा जळगाव

मग काय नाथाभाऊंनी प्रवेशाचे आमंत्रण हसत हसत स्वीकारले !

रिड जळगाव प्रतिनिधी ::> माजी मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाबाबत अनिश्चितता कायम असतानाच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी थेट मुक्ताईनगरला जाऊन खडसे यांना आमंत्रणच देऊन टाकले. त्यांनी दिलेला आमंत्रणाचा पुष्पगुच्छ खडसे यांनीही हसत हसत स्वीकारला.

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजपला लहानाचे मोठे करण्यामागे आपल्या आयुष्याचे ४० वर्ष घातले. आपल्या जीवनाचे पाणी केले त्याच पक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून नाथाभाऊ यांच्यावर सतत अन्याय होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाथाभाऊ पक्ष बदल करणार अशी चर्चा सुरु होती. परंतु नाथाभाऊ नेमक्या कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नव्हते, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून हेच स्पष्ट झाले आहे की, नाथाभाऊ हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह अनेक कार्यकर्त्यामंध्ये आनंदाचे वातावरण आहे. खडसेंनी लवकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी नाथाभाऊ यांना भेटून साकडे घातले आहे.

राष्ट्रवादीत नाथाभाऊ आल्यास बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने एका नेत्याला न्याय मिळणार असून याचा अर्थातच पक्षाला फायदाच होणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी या पदाधिकार्‍यांनी केले. यामुळे नाथाभाऊंनी तातडीने पक्षात प्रवेश घ्यावा असे साकडे देखील त्यांना घालण्यात आले. यावेळी माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अमित पाटील, कार्यालय चिटणीस संजय चव्हाण, अजय बढे आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे खडसे यांना शिवसेनेकडून ऑफर दिल्या जात आहे. तर राष्ट्रवादीत जवळपास खड्सेंचा प्रवेश निश्चित मानला जात असताना नाथाभाऊ दुसऱ्या दरवाजाने शिवसेनेत जातील का? असा प्रश्न माध्यमांत उपस्थित झाला आहे.