जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक ; २४ पर्यंत पोलीस कस्टडी

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील वाघुळदे नगरातील घरफोडी करुन एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविणार्‍या तीन संशयितांना शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (25), पंकज उर्फ गोलु समुद्रे (22) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (28) सर्व रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ अशी तिघा संशयितांची नावे आहेत. चौकशी केली असता त्यांनी वाघुळदे नगरातील यश संजय ठाकूर यांच्या घरातून एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविल्याची कबुली दिली व जेथे हे साहित्य ठेवले होते तेथून काढून दिले. तिघांना पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज न्यायालयात हजर केले असता तिघांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.