जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन स्वीकृती

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुक १५ जानेवारीला होणार आहे. यासाठी बुधवारपासून (ता.२३) प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार आहे. यासाठी ११ ते दुपारी ३ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

तहसील कार्यालयातून विक्री
तहसील कार्यालयातून या अर्जाची विक्री व अर्ज स्वीकृत केले जाणार असल्याने जिल्हा परिषदेकडून तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावून वाहनांची वाहतूक बंद केली आहे. केवळ पादचारींनाच प्रवेश दिला जात आहे.

विक्रेत्यांसाठी जागेत बदल
परिसरातील स्टॅम्प वेंडर्स, विक्रेत्यांसाठी जागेत बदल केला आहे. अर्ज घेण्यासाठी कार्यालयात मंडप टाकून सर्कलनिहाय स्वतंत्र टेबल लावले आहेत. तहसीलदार नामदेव पाटील यांनी मंगळवारी याबाबत घेतलेल्या बैठकीत हे नियोजन करुन सुचना दिल्या आहेत.