जळगावात तरुणाचा बाथरूममध्ये काेसळल्याने झाला मृत्यू

Jalgaon जळगाव

जळगाव ::>आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा घराच्या बाथरूममध्ये पाय घसरून काेसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

सचिन राधेश्याम राणा (वय ३९, रा. नवीपेठ असे मृत तरुणाचे नाव आहे. एलआयसी एजंटचे ताे काम करायचा. शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ताे झोपेतून उठला. अंघोळ करण्यासाठी ते बाथरूममध्ये जात असताना त्याचा पाय घसरल्याने ताे खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर जखमी झाली. त्याला तातडीने नातेवाईक नितीन फकीरचंद दाळवाले (रा. शिवाजीनगर) यांनी खासगी रूग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने त्यास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.