विटेनरला तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Jalgaon Jalgaon MIDC अपघात क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (वय २४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राकेश जाधव हा तरुण विटनेर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गॅरेज चालवून व सोबत शेती करून कुटुंबियांना उदरनिर्वाहात हातभार लावायचा. शुक्रवारी सकाळी राकेश हा शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करत असताना विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा मृत्यू झाला.