पोलिसांच्या धाडीत 5 हजारांचे देशी, विदेशी मद्य जप्त ; आरोपी अटकेत

क्राईम जळगाव

जळगाव > शहरातील अजिंठा चौफुली ते कालिंका माता मंदिर परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर जवळ पोलिसांनी धाड टाकून पाच हजार रुपयांच्या विदेशी, देशी आणि हातभट्टी च्या दारूच्या बाटल्या व कॅन जप्त केली. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या धाडीत 5 हजारांचे देशी, विदेशी मद्य जप्त ; आरोपी अटकेत

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो. कॉ. हेमंत कळसकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या सूचनेवरून आणि खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सहाय्य्क फौजदार रामकृष्ण पाटील आणि हेमंत कळसकर यांनी दोन पंचासमक्ष ही कारवाई करून आरोपीच्या ताब्यातील मुद्देमाल जागेवर जप्त केला. संदीप महाले (वय29,सिद्धिविनायक शाळेजवळ, सद्गुरू नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *