जळगावात गोलाणी मार्केटात नराधमाकडून १० वर्षाच्या बालिकेवर अत्याचार…

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव (प्रतिनिधी) >> जळगावातील गोलाणी मार्केटच्या थर्ड फ्लोअरवर आज दुपारी एका १० वर्षाच्या बालिकेवर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीच्या आधारे, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट लगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पिडीत मुलगी उभी होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तुला खायला देतो म्हणून तिला थर्ड फ्लोअरवर नेले. थर्ड फ्लोअरवरील एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत शहर पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केट गाठले. पिडीत मुलीकडून घटनास्थळाबाबत माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, शहर पोलीस सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पिडीत मुलीचे कपडे रक्ताने माखलेल होते. भेदरलेली असल्यामुळे तिला व्यवस्थित माहितीसुद्धा सांगता येत नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *