जळगावातील गंभीर प्रकारचे गुन्हे असलेल्या 14 गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून एका वर्षांसाठी हद्दपार!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव >> जळगाव शहरात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 14 जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एक वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच पारीत केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात एमआयडीसी, जळगाव शहर व शनिपेट या पोलिस स्टेशनच्या हद्दीत व परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे रस्ता आडवणे, बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करणे, दंगा करणे, शस्त्र बाळगून दुखापत करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे या सदराखाली खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांनी संबंधितांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *