वाहक मनोज चौधरींच्या आत्महत्येप्रकरणी दोषींचे तत्काळ निलंबन करा

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> मृत एसटी वाहक मनोज चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जळगाव विभागाच्या संयुक्त कृती समितीने विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी जळगाव आगारात झाली. यात मनोज चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास संयुक्त कृती समितीतर्फे २ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

या वेळी मान्यताप्राप्त संघटनेचे सुरेश चांगरे, इंटकचे नरेंद्रसिंग राजपूत, कामगार सेनेचे आर. के. पाटील, गोपाळ पाटील, शैलेश नन्नवरे, विनोद शितोळे, मनोहर मिस्त्री, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे व सह व्यवस्थापक नीलेश पाटील यांना कृती समितीने निवेदन दिले आहे. नीलेश पाटील यांना कृती समितीने निवेदन दिले आहे.