जळगाव >> शहरातील जिल्हा कोवीड रूग्णालयासमोरील सुसाट सुटलेल्या कारवरील ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक देऊन रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. यात विद्युत वाहक असलेला खांब वाकला असून यात कारचालक जखमी झाला आहे. चालकाच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा कोवीड रूग्णालयासमोरील दुभाजकाजवळ शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक (MH19CV10)धडक दिली. यात दुभाजकामध्ये असलेल्या खांब वाकला गेला तर कारचालक मुफ्फदल अली हुसेन अमरेलीवाला हा गंभीर जखमी झाला. अपघात होण्यापुर्वी याच कारने रिक्षा क्रमांक (MH19J6291)ला जोरदार धडक दिली. नवी कोरी गाडी असल्याने कारचा अपघात होता. कारच्या एअरबॅगमुळे चालक थोडक्यात बचावला. मात्र पायाला गंभीर दुखापत झाली असून खासगी हॉस्पिटलात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता उमेश घुगे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कारचालक मुफ्फदल हुसेन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.