अर्णब गोस्वामींच्या अटकेवर माजी मंत्री आ. गिरीश महाजन, यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, खा. उन्मेश पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी केला निषेध
रिड जळगाव टीम मनु निळे ::> आज सकाळी म्हणून रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी अटक केली असून यावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मिडीयाद्वारे संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला आहे.
भाजपा जिल्ह्याध्यक्ष राजूमामा भोळे यांनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट
भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. नागपूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारविरुद्ध तीव्र निषेध आंदोलन.
आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!
आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.
अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.
आमदार गिरीश महाजन यांची फेसबुक पोस्ट
महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या !
सरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध !
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे.
लोकशाहीच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे सर्व ढोंगी पुरोगामी, सेक्युलर व तथाकथित निष्पक्ष पत्रकार या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध, पत्रकारितेच्या गळचेपीविरुद्ध मौन बाळगून आहेत…
ArnabGoswami
खासदार उन्मेश पाटील यांची फेसबुक पोस्ट
सत्तेचा माज महाविकासाघाडीकडून लोकशाहीची हत्या !
सरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध !
ArnabGoswami
https://www.facebook.com/unmeshbjp/photos/a.1539756256308061/2770383743245300/?type=3&theater
आमदार मंगेश चव्हाण यांची फेसबुक पोस्ट
आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!
जाहीर निषेध..!!!