हुंडा कमी दिला म्हणून २२ वर्षीय विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

एरंडोल क्राईम

एरंडोल >> लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरून २२ वर्षीय विवाहितेस मारहाण केल्याच्या आरोपावरून पतीसह, सासू, सासरा, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ज्योत्स्ना हितेश महाजन (वय २२) यांचे पती हितेश गोविंदा महाजन, सासू शोभाबाई गोविंदा महाजन, सासरा गोविंदा विश्राम महाजन, नणंद पूनम चंदू महाजन व नणंदेचे पती चंदू मन्साराम महाजन हे लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरून त्यांना सतत मारहाण करून शिवीगाळ करत होते.

याबाबत ज्योत्स्ना महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरा, नणंद व नणंदेचा पती यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.