हिंगोणा ता यावल :: येथील गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेचे तार कंपाउंड तुटलेले असल्याने शाळेत गावातील काही उपद्रवी कडुन शाळेत नुकसान करण्यात येत होते.
तसेच येथील एलईडी टीव्ही सुद्धा चोरी करण्यात आला होता. या शाळेतच लहान मुलांची अंगणवाडी केंद्र सुद्धा असल्याने उपद्रवी भरपूर नुकसान करत होते. तसेच या शाळेत निवडणूक केंद्र सुद्धा असल्याने निवडणूक काळात सुद्धा अधिकाऱ्यांना अडचण निर्माण होत होती. त्या अनुषंगाने या सर्व बाबींचा विचार करता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी अंदाजित रक्कम 13 लक्ष ही 2018 .19 मध्ये मंजूर झालेली असल्याने या संरक्षक भिंतीचे उद्घाटन रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते नुकतेच उत्घाटन करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी जि प सदस्य प्रभाकर सोनवणे सविता भालेराव प सं सदस्य शेखर पाटील योगेश भंगाळे हिंगोणा ग्रा प प्रभारी सरपंच महेश राणे तसेच राजेंद्र राणे किशोर फालक शशिकांत चौधरी श्याम महाजन भरत पाटील अशोक फालक रविंद्र पाटील छगन गाजरे नवलसिंग लोंढे छबु तडवी शांताराम तायडे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते