हिंगोण्यात डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे : शांताराम कोळी

यावल सिटी न्यूज

यांची.सा.बा. विभागाकडे तक्रार.
हिंगोणा. ता यावल येथिल गावात मोर धरण कॉलनी रस्त्याचे तडवी वाड्या कडे जाण्याचे रस्ता डांबरीकरण हा निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. व संबधीत ठेकेदार हा मन मानी पणे काम करीत आहे, अशी तक्रार शांताराम पंडीत कोळी यांनी दिली आहे. तसेच तक्रार मध्ये म्हटले आहे की, सदर रस्त्यावर खडी व डांबर हलक्या प्रतीचे वापरले जात आहे. तसेच या रस्त्याचे काम बोगस होत असून त्याची चौकशी करण्यात यावी व चांगल्या प्रतीचे काम करण्यात यावे अन्यथा काम बंद करण्यात यावे अशी मागणी तक्रार मध्ये करण्यात आली आहे, तसेच निवेदनावर ग्रामस्थ रविद्र ( बाळु ) कुरकुरे यांची पण स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *