साकळीत किनगाव-अडावद-मध्य प्रदेशातून होते गुटखा तस्करी ; प्रशासनाचे दुर्लक्ष

अडावद किनगाव क्राईम यावल साकळी सिटी न्यूज

साकळी प्रतिनिधी >> येथील मुख्य चौक, मधु आप्पा चौक, ग्रामपंचायत परिसरासह संपूर्ण साकळी गावात गुटख्याची विक्री जोरदार वाढली आहे. गावातील काही भागातून तसेच बाजारपेठ वाणी गल्ली भोनक नदी परिसरातून गुटख्याचे व्यवहार चालतात. तत्पूर्वी, राज्यात बंदी असलेला गुटखा अडावद-किनगाव-मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने गावात आणून नंतर परिसरात विक्री केला जात आहे. गुटखा तस्करांचे रॅकेट सक्रिय आहे. गुटखा हा गावात मध्यरात्री किनगाव-अडावद येथून आणला जातो.

यावल तालुक्यात दिवसेंदिवस गुटख्याची विक्री जोरदार होत असल्याने तालुक्यातील अनेकांना कर्करोग सारख्या आजरांना आमंत्रण मिळत आहे. गुटखा विक्री न थांबल्यास अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. साकळीसह यावल तालुक्यात अन्न व औषद्य प्रशासन विभागाने त्वरित लक्ष देऊन संबधित अवैध विक्री करणाऱ्या होलसेल धारकांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.