शिक्षकांना वेतनासाठी पैसे नसलेल्या राज्य सरकारकडे मंत्र्यांना बावीस लाखांच्या गाड्यांसाठी पैसा आला कुठून? विनावेतन शिक्षकांचा सरकारला प्रश्न!

नवापूर महाराष्ट्र

नवापूर प्रकाश खैरनार प्रतिनिधी >> एकिकडे राज्यासह संपूर्ण विश्वात कोरोना सारख्या महामारिने कहर केले असुन या काळात आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात असलेल्या शिक्षकांना वेतनासाठी सरकारकडे पैसा नाही असे म्हणणारे सरकारकडे राज्यातील मंत्र्याना गाडीसाठी करोडो रूपये आले कुठुन असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.

राज्यात असे हजारो शिक्षक आहे जे गेल्या 20 वर्षांपासून विनावेतन काम करत आहे. एवढेच नव्हे शाळा करुन इतरत्र काम करून आपल्या परिवाराचे पोट भरणाऱ्या शिक्षकांना लॉकडाउनमुळे होते ते काम देखील बंद झाले आहे व परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे असे असतांना या शिक्षकांनी घरी बसून आंदोलने केले आहेत.

या अगोदर आझाद मैदानावर आंदोलने केली आहेत. या सर्व गोष्टी राज्याचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षक आमदार अवगत असतांना या शिक्षकांना वेतनाचा प्रश्न सोडवायचा महत्त्वाचा असतांना मंत्र्यांना गाडीचा ठराव मंजूर होतो हे कितपत योग्य आहे ? आज राज्यात कायम विनाअनुदानित, उच्च माध्यमिक विभागातील वाढीव पदांचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित असताना या शिक्षकांच्या वेतनासंबंधी काम करण्यासाठी लॉकडाउन मुळे अधिकारी वर्ग मंत्रालयात येत नाही. हे कारण देऊन टाळाटाळ होत असुन मंत्र्यांचा गाडीचा ठराव पास करतांना कोणते अधिकारी उपस्थित होते असा सवाल देखील या शिक्षकांकडून केला जात आहे.

कोरोना सारख्या महामारित सुध्दा शिक्षक कूठे दारूच्या दुकानावर तर कुठे वाहनांची लाईन लावण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असून शिक्षक नको ती कामे करून शासनादेश पाळत आहेत. शाळा जरी बंद असल्यातरी आनलाईन आपले शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. कारण काय तर सरकारकडे पैसा नाही असे सांगण्यात येते मग हा पैसा आला कुठुन याची माहिती सरकारने जनतेला दयावी.

मगच गाडी घ्यावी नाही तर याचा जवाब मतदार येणाऱ्या निवडणुकीत देतील अश्या प्रतिक्रिया शिक्षक वर्गाकडून दिल्या जात आहे. कोरोना आपत्ती काळामधे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. सरकारची तिजोरी रिकामी आहे म्हणून गोर गरीबांच्या विकास योजनांना काञी लावली जात असताना मंत्र्यांना 20-20 बावीस बावीस लाख रूपयांच्या पाच पाच इनोव्हा गाडी घ्यायला मात्र धाड धाड शासन निर्णय विशेष बाब म्हणून काढून उपलब्ध करून दिले जात आहेत.
खरे कोरोना योध्दा कोण खूपच दुःखद कोरोना योद्धा कोण रस्त्यावर उतरून कोरोना विरूद्ध स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढणारे कर्मचारी का 22 लाख रूपयांच्या गाडीत बसून फिरणारे हे राजकारणी…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *