गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू तस्करी टोळीतील ७ आरोपी पोलिस कोठडीत रवाना

Jalgaon क्राईम गिरणा जळगाव धरणगाव

धरणगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीतील ७ जणांना धरणगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली होती.

त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. वाळू ठेकेदार तथा भाजप नगरसेवक कुलभूषण पाटीलसह १२ जणांवर गुन्हा दाखल केला.

त्यापैकी डंपर चालक प्रमोद सुभाष चव्हाण (सावदे), अनिल योगराज सपकाळे (रा.आव्हाणे), भगवान सोमा सोनवणे (रा.बांभोरी प्र.चा), सचिन शंकर पाटील (रा.शेंदुर्णी), सिद्धार्थ अशोक अहिरे (रा.पिंपळकोठा), दोन खबरे अनुक्रमे मुकुंदा राजू पाटील, दीपक धनराज पाटील (रा.वैजनाथ) यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले.