माजी मंत्री एकनाथ खडसे शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेवर गिरीश महाजन काय म्हणाले?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

रिड जळगाव टीम ::> सध्याला सोशल मीडियावर भाजप नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. अनेकदा एकनाथ खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले…भाजप प्रतिकूल परिस्थितीत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काम केलं आहे. त्यामुळे आता पक्षासाठी अनुकूल परिस्थिती असताना त्यांनी पक्ष सोडू नये, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. सरकारनामाशी ते बोलत होते.

दरम्यान, एकनाथ खडसेंची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *