गिरणा धरणाखालील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाचोरा भडगाव

पाचोरा ::> गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या सातत्यपूर्ण पावसाने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. ७ सप्टेंबर रोजी सद्यपरिस्थितीत धरणाचा जिवंत पाणीसाठा ८५ टक्के झाला आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाह कायम राहिल्यास धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही क्षणी गिरणा नदी पात्रात गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येईल. त्या दृष्टीने सावधगिरीचा इशारा म्हणून गिरणा नदीकाठच्या गावांना मालमत्ता, घरे आदींना जीवित हानी होऊ नये म्हणुन तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत नदीकाठच्या लोकांनी सतर्कता व सावधगिरी बाळगावी. अशा सुचना पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी पाचोरा – भडगाव तहसिलदार, पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, पंचायत समिती, पाचोरा – भडगाव सह गिरणाकाठावरील गावांना सुचना दिल्या आहेत. तर जळगाव गिरणा पाट बंधारे, जिल्हाधिकारी, जळगाव सह आदींना याबाबत कळविण्यात आले आहे.

पाचोरा-भडगाव तालुक्यासह गिरणाकाठावरी सर्व गावातील पोलिस पाटील यांच्या वतीने नदी काठच्या गावांतील नागरिकांनी पाण्यात जाऊ नये, सतर्कता बाळगून सावध राहावे, पाण्यापासून दूर राहावे अशा विविध सूचना व दवंडी देऊन आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *