नोकरीचे आमिष; भुसावळच्या तरुणीस ९३ हजारांत गंडवले

क्राईम चोरी, लंपास भुसावळ

जळगाव >> ‘एअर इंडिगो’ या विमान कंपनीत नोकरीचे आमिष देत भामट्याने तरुणीस ९३ हजार २५० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. ८ ते १८ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. पूजा बजरंग कुमावत (वय २१, रा. भुसावळ) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. अमित मित्तल नावाच्या भामट्याने पूजाच्या जीमेल आयडीवर नोकरीचे आमिष दिले. तिचा मोबाइल क्रमांक घेऊन एअर इंडिगो कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. दरम्यान भामट्याने तिच्याकडून ऑनलाइन ९३ हजार २५० रुपये बँक खात्यावर मागवून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पूजाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.