पाचोऱ्यात भर रस्त्यावर दारू पिऊन चार युवकांचा धिंगाणा ; पहा पुढे काय झाले ?

क्राईम निषेध पाचोरा पाेलिस

रिड जळगाव पाचोरा टीम >> पाचोरा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालणे चौघांना चांगलेच महागात पडले. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या या चौघांना पोलिसी प्रसाद देत गुन्हा देखील दाखल झाला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास हॉटेल भाग्यलक्ष्मी समोरील रस्त्यावर चौघांनी दारुच्या नशेत गोंधळ घातला. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. यामुळे परिसरातील १०० ते १५० नागरिकांची गर्दी जमा झाल्याने दोन्ही बाजूंनी अर्धा तास वाहतूक कोंडी झाली.

या प्रकाराबाबत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तातडीने कर्मचारी पाठवून गर्दी पांगवली. भर रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चौघांपैकी एक युवक आरडाओरडा करत होता.

यामुळे पोलिसांनी युवकांना चोप देऊन सार्वजनिक जागी गोंधळ घातल्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. देविदास उर्फ देवा त्र्यंबक पाटील, देवसिंग आत्माराम पाटील (रा. दोघे वडगाव टेक), विशाल रवींद्र कंडारे (रा. पांडव नगरी) व भूषण धनराज कंडारे (रा. शास्त्रीनगर, पाचोरा) अशी गुन्हा संशयितांची नावे आहेत. तपास हवालदार संदीप सोनवणे करत आहेत.