भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अपघात ; एक जण ठार

अपघात क्राईम फैजपूर भुसावळ यावल

यावल >> तालुक्यातील भुसावळ-फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सांयकाळी घडला. विकास धनसिंग पाटील-जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी पाटील हे पाडळसे येथे नातेवाइकांकडे आले होते. सायंकाळी ७.३० वाजता ते पाडळसेहून दुचाकीने (एमएच. १९ एसी.१४४३) जळगावला जाण्यासाठी निघाले. भोरटेक फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ते जागीच ठार झाले.