मनसे विद्यार्थी सेनेचे जामनेर महाविद्यालयास परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क माफ करणे बाबत निवेदन

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा जामनेर

भुषण मनोहर जाधव, जामनेर >> येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात BCA व इतर शाखेतील मुलांच्या बॅक राहिलेल्या मुलांची परीक्षा शुल्क घेऊन देखील परीक्षा न घेतल्याने ते शुल्क परत करणे व प्रवेश फी माफ करणे या बाबत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी नुकतेच प्राचार्य शिरीष पाटील यांना निवेदन दिले.

महाविद्यालयात जे विद्यार्थी बॅक राहिले होते त्यांनी परीक्षा शुल्क भरून व हॉल तिकीट हातात मिळाल्यानंतर ही परीक्षा रद्द झाल्याने या समस्त विद्यार्थ्यांचा नाहक चिंता वाढलेली आहे ,यात या सर्व मुलांमध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे कारण या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करून व हॉल तिकीट मिळून देखील परीक्षा रद्द झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते व या बॅक मुलांना हे विषय पास करून मुक्त करण्यात येणार होते मात्र विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे व त्यात पुन्हा परीक्षा शुल्क व परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सक्ती केली जात आहे.

सदरील विद्यार्थ्यांना कोरोना परिस्थिती चे भान लक्षात घेऊन व ग्रामीण भागातील मुलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांची प्रवेश फी व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे व बॅक विद्यार्थ्यांना या परीक्षेतून मुक्त करून सरसकट पुढील वर्गात प्रवेश द्यावा व विद्यार्थ्यांची या वर्षा चे परीक्षा शुल्क विद्यापीठाकडे जमा असल्याने ती त्वरित परत करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही विद्यार्थ्यांची फसवणूक व पिळवणूक धकवून घेणार नाही त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून महाविद्यालया मार्फत विद्यापीठाशी चर्चा करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल ने जिल्ह्यात व महाराष्ट्रात आंदोलन छेडेल व कोणतेही वर्ग भरू देणार नाही अशी ताकीद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाविद्यालयास दिली आहे.

सदरील निवेदन प्रा.शिरिष पाटील ,उप प्राचार्य खडायते ,गोतमारे यांना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील ,मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील ,तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मिक कोळी , सागर जोशी , अंकुश सकट , आफताब अलिन ,कौनिंन हसन , प्रियंका परदेशी ,रोशनी सुरवाडे आदी उपस्थित होते.