एरंडोल पोलिस स्थानकात ‘नाे मास्क नाे एन्ट्री’

एरंडोल पाेलिस

एरंडोल प्रतिनिधी ::> तालुक्यासह शहरात सध्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी ही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने एरंडोल पोलिस ठाण्यात ‘तोंडावर मास्क नाही तर पोलिस स्थानकात प्रवेश नाही’ या उपक्रमाची अंमलबजावणी सपोनि स्वप्निल उनवणे यांनी सुरू केली आहे.

तहसील कार्यालय, पोलिस ठाणे हे येथे एकाच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. कोरोनाची लस उपलब्ध नसल्यामुळे मास्क हा एकमेव व प्रभावी उपचार असल्यामुळे तहसीलदार अर्चना खेतमाळीस व सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा फलक या ठिकाणी लावण्यात अालेला आहे.

दरम्यान, एरंडाेल शहरातील धरणगाव चौकात १४ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये तोंडावर मास्क न लावता दुचाकी चालवणाऱ्या चालकांकडून तसेच फिजिकल डिस्टन्सचा भंग करणाऱ्या ३५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास ७० हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली.

पाेलिसांनी शहरातही कारवाई सुरु करण्याची केली जातेय मागणीमास्क न लावणाऱ्यांवर धरणगाव रस्यावरील चौकात राबवण्यात येणारी दंडात्मक कारवाई केली जात असून त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात अाहे. अशाच प्रकारची कारवाई एरंडोल शहरातही सुरू करावी, यामुळे एरंडोल शहर व तालुका लवकरच कोराेनामुक्तीकडे वाटचाल करेल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास खैरनार, विलास पाटील यांच्यासह होमगार्ड करत आहेत. शहरातही अनेक जण मास्क न लावता फिरत असतात. जर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला तर लाेक मास्कचा वापर करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *