एरंडोल प्रतिनिधी >> दि. २५ रोजी खर्ची बु गावात एक रूग्ण कोरोना पॉजिटीव्ह निघाला होता. त्यानंतर पॉजिटीव्ह रुग्णांवर उपचार केलेले गावातील डॉक्टर यांचा देखील रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनाने खर्ची गावात धाव घेत पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना कॉरंटाईन केले आहे. परंतू कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात कुठल्याही प्रकारे ग्रा.पंचायत प्रशासनाकडून सॅनिटाईजर फवारणी करण्यात आलेली नाही. तसेच सिल केलेल्या परिसरात कुठल्याही प्रकारे नियम पाडले जात नसून आमच्या आरोग्या सोबत प्रशासनाने खेळ मांडला आहे. अशी माहिती गावातील नागरीकांनी दिली. तसेच गावात करण्यात आलेल्या भूमिगत गटारीचे पाणी बस-स्टेड परीसरात ब्लॉक झाले आहे. पाण्याचा पूर्णपणे दुर्गंध येत असुन डासांचे साम्राज्य वाढल्याने गावातील नागरीकांच्या आरोग्याला मोठा धोका आहे.