विवाहितेचा २ लाख रुपयांसाठी छळ, एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल क्राईम निषेध

एरंडोल >> नोकरीसाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह इतर नातेवाईकांवर एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कागदीपुरा भागातील रहिवासी शाहिस्ताबी विकार मनियार यांचे शहरातील सय्यद वाड्यातील विकार हुसेन मणियार यांच्याशी ८ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. त्यांना तीन मुली आहेत. तर पहिली मुलगी झाल्यावर त्यांनी विवाहितेला त्रास देणे सुरु केले.

पती विकार हुसेन मन्यार हा नोकरी व व्यवसायासाठी माहेरहून २ लाख आणावे यासाठी छळ करायचा. तिचे दागिने काढून घेत माहेरी रहा, अशी दमदाटी केली. त्या दिवसापासून विवाहिता आई-वडिलांच्या घरी आहे.

तरीही विवाहितेचा पती विकार हुसेन मन्यार, जेठ सय्यद हुसेन मन्यार (दोघे रा. एरंडोल), मामसासरे मुस्ताक शेख ईसा मन्यार (रा. जळगाव) व नणंद रोशन हुसेन मन्यार (रा. एरंडोल) यांचा त्रास सुरू होता.

याप्रकरणी शाहिस्ताबी मन्यार यांच्याफिर्यादीनुसार एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.