अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी चालक जागीच ठार

अपघात एरंडोल क्राईम

एरंडोल प्रतिनिधी >> भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत तालुक्यातील रिंगणगाव येथील ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चाेरटक्की रस्त्यावर ही घटना घडली.

तालुक्यातील रिंगणगाव येथील इस्लाम यासिम पटेल (वय ५५) हे मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, सीए- ९२४७) रिंगणगावकडे जात होते.

यादरम्यान, रिंगणगाव ते चोरटक्की रस्त्यावरील बापू सीताराम पाटील यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

या अपघातात इस्लाम पटेल यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान घडली. याबाबत रऊफ गणी पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत पाटील तपास करत आहेत.