इलेक्ट्रिकल करंट पल्सेस ठरू शकतात विविध विषांणूवर मारक

Jalgaon Social कट्टा कट्टा जळगाव

(हर्षल सोनार) जळगावच्या ईलेक्ट्राेसाफ्ट सिस्टिम ची टीम अभ्यासतेय इलेक्ट्रिकल करंटचे विषानुवरील परिणाम. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक अपील केली होती की कोरोना विरुद्ध लढ्यात विविध क्षेत्रातील संशोधकांनी संशोधक वृत्ती ठेवून पुढे यावे.त्यावरून जळगाव ची electro-soft सिस्टिम ची टीम प्रेरित होऊन मागील २ आठवड्यापासून कामाला लागली. त्यांनी इलेक्ट्रिक करंट चे विविध विषानणुवर होणारे परिणाम अभ्यासायला सुरुवात केली त्यानुसार त्यांचे संशोधन अजून चालूच आहे .

याकरिता त्यांनी या आधीच्या संशोधकांचे काही शोध निबंध अभ्यासले. त्यात त्यांना असे आढळून आले की १९९० च्या डॉक्टर विलियम लेमन आणि स्टीव्हन कॅल्ली यांनी केलेल्या संशोधनानुसार विषाणूच्या सॅम्पल मधून ( HIV , N1H1 , INFLUENZA ) डायरेक्ट करंट पल्सस पास केल्या असता विषानुवरील आवरण प्रोटीन कोटिंग शेल ब्रेक होऊन विषाणूचा ऱ्हास होतो . या संशोधनाआधारे त्यांनी काही बॅक्टरीया वर टेस्ट घेतल्या तसेच संशोधनाच्या आधारे जर का इलेक्ट्रिक करंट च्या काही विशिष्ट पल्सस covid १९ च्या सॅम्पल मधून पास केले असता त्यांचा देखील ऱ्हास होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

तसेच या संदर्भातील विश्लेषण त्यांनी ICMR या संस्थेला ई-मेल द्वारे पाठवले आहे. त्याच्या या संशोधनाची ICMR व आरोग्य मंत्रालयाने दखल घेऊन संशोधनास पूर्णत्वास नेण्यास सहकार्य करावे असे मत ईलेक्ट्राेसाफ्ट सिस्टम चे संचालक निलेश वाघ व राजेश ठाकरे यांनी व्यक्त केले तसेच प्रत्यक्ष कामाची तयारी टीम असाेसीएट अमेय राणे यांनी दर्शवली आहे.


ELECTROSOFT च्या म्हणण्यानुसार हॉस्पिटल आउटलेट च्या पाण्यामध्ये संबंधित प्रयोगातील ELECTRODE लावले असता आउटलेट मधील पाण्याचे निर्जंतुकीकरण हाेऊन विविध रोगांचा फैलाव रोखता येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *