एकता कपूरचा युवा मल्हार सेनेच्या वतीने जाहीर निषेध !

Jalgaon जळगाव

रिड जळगाव ::> एकता कपूर यांनी zee5 व ALT Balajiअभिनेत्रीने यांची वर्जिन भास्कर या वेब सिरीज मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव गर्ल्स हॉस्टेल ला नाव देवून अपमानकारक चित्रण केले आहे. याचा युवा मल्हार सेनेच्या वतीने जाहीर निषेध करून एकता कपूरवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशन व तहसील अधिकारी कार्यालय चोपडा यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मयुर काटकर, तालुका अध्यक्ष राहुल धनगर , उपा. अविनाश धनगर, चोपडा शहर अध्यक्ष गिरिराज कंखरे कंखरे, उपाध्यक्ष रोहित धनगर तसेच सागर धनगर, भुषण धनगर, विश्वजित धनगर व समस्त युवा मल्हार सेना चोपडा शहर व तालुका पदाधिकारी उपस्थित होते, अधिक माहिती चोपडा शहर उपाध्क्ष रोहित धनगर यांनी दिली

लवकरच एकता कपूर हिने तो शॉर्ट डिलीट करून समाज बांधवांचे जाहीर माफी मागावी… अन्यथा एकता कपूर महाराष्ट्रभरात फिरणे बंद करू….
असा पवित्रा समाजाने घेतला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *