Breaking : भाजपला मोठा धक्का, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

रिड जळगाव टीम ::> गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरु आहे. पण, आता खडसेंचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

माजी मंत्री खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे खडसे हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या ही चर्चा रंगल्या आहेत.

खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते पण.
परंतु, आता भाजपा नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

माजी मंत्री भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत एन्ट्री केल्यानंतर खडसेंसोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे खान्देशातील अनेक आजी-माजी नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

एकनाथ खडसे भाजपावर नाराज असल्यामुळे खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. अखेर आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे.

संदर्भ ::> लोकमत न्यूज 18 BREAKING : भाजपला मोठा धक्का, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित