एकनाथ खडसेंची अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

Aurangabad Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक पुणे महाराष्ट्र माझं खान्देश मुक्ताईनगर रिड जळगाव टीम

मुंबई >> भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

ईडीने आपले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. याबाबत आज न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर, याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी 25 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंची मागणी काय?

एकनाथ खडसेंनी आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी या याचिकेत आहे. शिवाय तपासात सहकार्य करत असल्याने कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे. आता सोमवारी न्यायालय महत्वाचे आदेश देणार आहे.

उच्च न्यायालयातील युक्तीवाद लाईव्ह

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि पितळे यांच्या न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू
सरकारच्यावतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे युक्तिवाद करत आहेत.
सीबीआय, न्यायालय आणि रिझर्व बँक हे स्वतंत्र यंत्रणा आहेत त्यांच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही.

– न्यायालय वकील सिंग – हा साधा एफआयआर नाही…या बाबत ईडीने ईसीआर दाखल केला आहे. यात अनेक आरोपी आहेत.

न्यायालय – तुम्हाला असे का म्हणायचे आहे की, या आरोपीला सवलत देऊ नये.

खडसेंची याचिकेत मागणी – ईडी चौकशीचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावे.

ही मागणी आम्हाला मान्य आहे – अॅड अनिल सिंग , ईडीचे वकील

ईडीला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करायचे असेल तर ईडी सादर करू शकते.

पुढील सुनावणी पुढील सोमवारी, एकनाथ खडसेंची सहा तास चौकशी

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची 15 जानेवारीला ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

कोणताही दबाव नाही

“ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी दोनवेळा भोसरी जमीनप्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युरो, आयकर विभाग आणि झोटिंग कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असे सांगतानाच ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावलेलेही नाही”, असे खडसे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा 40 कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचे सांगितले जाते. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचे सांगतिले जाते.