रिड जळगाव टीम ::> गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खान्देशात विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीला खडसें सारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी आशा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना आश्रय देऊ शकते.
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे दिसते. खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचे दिसते.
आगामी काळात होणारी जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला फायदा होऊ शकेल. एकनाथ खडसेंसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला खिंडार पडेल, असंही रवींद्र भैय्या पाटील यांना वाटतं.