एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली ऑफर

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा असताना शिवसेनेकडून नवीन ऑफर

रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आज पुन्हा शिवसेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे खंबीर नेतृत्व असणाऱ्या नाथाभाऊंना शिवसेना प्रवेशाची ऑफर आली आहे.

एकनाथ खडसे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. उत्तर महाराष्ट्राचा भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी खडसेंनी खूप कष्ट करून झटले मात्र त्यांचा पक्ष त्यांना सोडणार असल्याच्या चर्चा चालू असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

पुढे म्हणाले, एकनाथ खडसे दुसरा विचार करत असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, असं उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

1 thought on “एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली ऑफर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *