एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

Jalgaon Politicalकट्टा जळगाव

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढील आठवड्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते माजी मंत्री भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चाचपणी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा या आधीपासूनच सुरु आहे. खडसे यांनी त्यावेळी वृत्ताचे खंडन केले होते, परंतु ज्याप्रकारे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

गेल्या आठवड्यात जनसेवेचा मानबिंदू पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेवून हल्ला केला होता.

फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला असे ते जाहीरपणे बोलले. यानंतर खडसे यांनी पक्ष सोडण्याबाबत थेट भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. विधानरिषदेतील काही जागा ऑक्टोबर महिन्यात रिक्त होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर खडसे यांना घेण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे एकनाथ खडसे जर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील तर त्याचा फायदा पक्षाला महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात किती होईल, याबत जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मात्र काहींच्या मते खडसे प्रवेश करण्याची शक्यता आहे असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. आता काळ आणि वेळच ठरवेल की खडसे काय भूमिका घेतात. मात्र आजपासूनच खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *