एकनाथ खडसे यांची ईडीकडून ६ तास चौकशी

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

मुंबई >> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) तब्बल साडेसहा तास चौकशी केली. यापुढेही ईडीने चौकशीसाठी बोलावल्यास आपण हजर राहू व त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देऊ, असे खडसे यांनी चौकशी संपल्यानंतर कार्यालयाबाहेर पडताना माध्यमांना सांगितले.

सकाळी ११ वाजता खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले. थोडा अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांची मुलगी शारदा सोबत होत्या. खडसे यांना ३० डिसेंबर रोजी ईडीने पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होते. भोसरीच्या जमीन खरेदी प्रकरणी त्यांना २०१६ मध्ये राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स आले.