माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव >> माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, खडसेंची मुंबईत पुन्हा चाचणी केली. तीदेखील निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. खडसेंना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दुसऱ्यांदा आरटीपीसीआर तपासणी करून घेतली.

मात्र, तो अहवाल येण्यापूर्वीच एचआरसीटी टेस्ट केली. त्यात त्यांच्या फुप्फुसात काहीअंशी लक्षणे दिसून आले होते. त्यामुळे ते पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना झाले होते. खडसेंची तब्येत बरी असून, मुंबईत घरी उपचार सुरू आहेत.