जळगावात यंदा ३१ फूटी रावणाचे होणार दहन

Jalgaon जळगाव

रिड जळगाव टीम ::> दरवर्षी शहरात एल.के.फाउंडेशनतर्फे विजया दशमी निमित्त मेहरूण तलाव येथे ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रावण दहन कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार होणार आहे. यावर्षी ३१ फुटी रावणाचे शिरसोली रोडवरील मोकळ्या मैदानात दहन करण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण करता येणार आहे.

कोरोनामुळे गर्दी करण्यास बंदी असल्याने यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. मात्र रावण दहन परंपरा खंडित होऊ नये यासाठी एल.ए. फाउंडेशनतर्फे यंदा ३१ फुटी रावण तयार करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते रिमोट कंट्रोलचे बटन दाबून रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.

नागरिकांनी गर्दी करून नये यासाठी यंदा शिरसोली रोडवरील रुस्तमजी शाळेच्या मोकळ्या मैदानात रावण दहन कार्यक्रम होणार असून त्याचे थेट ऑनलाइन लाइव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर अश्विन सोनवणे, सभापती राजेंद्र घुगे-पाटील, रंजना सपकाळे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, विष्णू भंगाळे उपस्थित राहणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष ललित कोल्हे, पीयूष कोल्हे यांनी कळवले आहे.