”जळगाव द्रोहीनो आतातरी षड्यंत्र करणे थांबवा” रुग्णालयाला बदनाम करून कोरोना जाणार नाही – सोशल मिडीयावर डॉ.उल्हास पाटील यांची संतापजनक पोस्ट!

Jalgaon जळगाव

ही पोस्ट त्यांच्या भाषेत जशाच तशी…!

डॉ. उल्हास पाटील कोवीड रुग्णालय व शिरलेल्या पाण्याचा काहीएक संबंध नाही….

शेजारील चौपदरी महामार्ग व उड्डाणपुलाची उंची वाढल्याने उंची कमी असलेल्या भागाकडे म्हणजेच रुग्णालयाकडे सर्व पाण्याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव तात्पुरत्या उभारलेल्या प्राथमिक उपचार विभागात पाणी..

कोवीड रुग्णालय सुरक्षितच..ही केवळ एक स्टंटबाजी रुग्ण सेवा अविरत सुरूच राहणार

काल जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसाचे आगमन झाले व संपूर्ण जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला. आज सकाळपासूनच सोशल मीडिया वरती डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात एक स्टंटबाजी चा व्हिडीओ व्हायरल होताना दिसून आला.परंतु त्या व्हिडिओ मागील सत्यता नेमकी काय आहे? याबाबत आपल्यासमोर एक खुलासा करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे सामान्य रुग्णालय व कोवीड रुग्णालय म्हणून घोषित केले.

जिल्हाधिकारी यांनी स्वतः रुग्णालयावर दाखल होऊन रुग्णालयाच्या प्रशासनास पाहणी केल्यानंतर आदेश दिले की, रूग्णालयाच्या 750 खाटांपैकी 400 खाटा या कोवीड साठी व 350 खाटा या सामान्य रुग्णांसाठी अधिग्रहित केल्या जातील.कोविंड रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत व त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिले व त्याच पद्धतीने सामान्य रुग्णांसाठी च्या इमारतीमध्ये त्यासाठी लागणारी वेगवेगळी उपायोजना करण्यासंबंधीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या प्रशासनाने युद्धपातळीवर रुग्णालय व सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू केले.

नेमके पाणी आत अचानक शिरण्याचे कारण काय?

परंतु त्या सर्व गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी तोपर्यंत लागणाऱ्या रुग्णांसाठी तात्पुरता अतिरिक्त प्राथमिक उपचार वार्ड इमारतीच्या खालच्या मजल्यावर करण्यात आला, की जो आजच्या व्हिडिओमध्ये आपणास दिसून येत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या बाजूने जात असलेला चौपदरी मार्ग व त्यावर असलेला उड्डाणपूल याचे काम पूर्ण झालेले आहे. उड्डाणपूल व चौपदरी मार्ग याची उंची आता रुग्णालयाच्या उंचीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असल्यामुळे उड्डाणपूल व महामार्गावरील सर्वच सर्व पावसाचे पाणी मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या बाजुला उतरती असल्यामुळे, त्या बाजुला सर्वच सर्व पाणी घुसल्यामुळे व तात्पुरता प्राथमिक उपचार वार्ड बिल्डींगच्या खालच्या मजल्यावर असल्याने, त्यामध्ये पाणी शिरले. परंतु रूग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ सर्व रुग्णांना वरच्या मजल्यावर ती शिफ्ट केले.

समाजकंटकांची स्टंटबाजी

परंतु काही समाजकंटक व जळगाव द्रोहींनी आज सकाळपासून असे चित्र केले की डॉ. उल्हास पाटील रुग्णालयांमध्ये कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा नाही. रुग्णांचे हाल होत आहेत व रुग्णालयांमध्ये पाणी गेले परंतु सत्यता ही नव्हे सत्यता आतापर्यंत मी जी सांगितली तीच आहे

सोयीसुविधा उपलब्ध असल्याने जिल्ह्याचे कोवीड व सामान्य रुग्णालय हे देखील शासनाने डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचं केले अधिग्रहित त्यामुळे कोरोणासारख्या यामहा संकटाशी लढा देताना सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.

लॉक डाऊन मध्ये मोठमोठ्या रुग्णालयांनी जिल्ह्यातील रुग्णांसाठी केली आहे त्यांचे दरवाजे बंद

आपणा सर्वांना चांगल्याप्रकारे माहिती आहे जळगाव जिल्ह्यामधील चांगल्या चांगल्या रुग्णालयांनी जिल्ह्यातील रुग्णांसाठी दरवाजे बंद केल्यानंतर जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय म्हणजेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय यांनीच आपली रुग्णसेवा अविरतपणे सुरू ठेवलेली आहे व रूग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मोठमोठ्या उपायोजना म्हणजेच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची सुविधा, प्लाझमा मशीनची सुविधा, यासारख्या हायटेक सुविधा एकाच छताखाली उपलब्धता असणारे रुग्णालय हे आज फक्त आणि फक्त डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालय हेच आहे.

अविरत सुरू असलेली रुग्ण सेवा खंडित करण्याचा प्रयत्न

परंतु केवळ राजकारण आणि बदनामीकरण्याच्या हेतू पुरस्कर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाला कसे बदनाम करता येईल व ते करीत असलेली अविरत रुग्णसेवा कशी खंडित करता येईल इतकेच या समाजकंटकांनी व जळगावद्रोहिंनी ठरवलेले आजच्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांना विनंती की आपण सुज्ञ आहात आपल्याला चांगलं आणी वाईट ह्या दोघी गोष्टी समजतात त्यामुळे कृपया या अशा समाजकंटकांना तात्काळ उत्तरे देऊन कोरोणाशी सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करून लवकरात लवकर आपला जळगाव जिल्हा कोरणा मुक्त कसा होईल यासाठी सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *