पहूर प्रतिनिधी ::> जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी बुधवारी पहूर पोलिस ठाण्याला भेट दिली. अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी पहूर पोलिस ठाण्याची पाहणी करून प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. रविवारी पहूर येथील कृषी व्यापाऱ्यास लुटले होते, या गुन्ह्याची माहिती घेतली.
यानंतर अवैध व्यवसाय बंद करणे, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही सुरु करणे, पोलिस कर्मचारी संख्या व पोलिस वाहनाची झालेली दुरवस्था आदी विषयांवर चर्चा केली.
पहूर येथे पोलिस निरीक्षक दर्जाचे पोलिस ठाणे निर्माण करण्याची मागणी केली. डीवायएसपी ईश्वर कातकडे, उपनिरीक्षक किरण बर्गे, अमोल देवढे उपस्थित होते. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा सत्कार केला.