महापरिनिर्वाणदिनी गर्दी करू नका, घरीच अभिवादन करा

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव >> महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी गोळा करू नये. घरीच थांबून अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

कोविड १९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे आयोजित कार्यक्रमाबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येताहेत.

गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथील महापरीनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अनुयायींनी चैत्यभूमी येथे न जाता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.